एक विचारवंत -शतशब्दकथा

एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते.

अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

त्याने देवाचा धावा केला.

देव हजर झाला.”वत्सा,काय मागणे आहे ?”

“मला माझी बायको परत पाहिजे.”

देवाने बुडी मारुन मधुबालाला बाहेर काढले.”घे तुझी बायको.”

” देवा, ही ती नव्हे.”

देवाने परत बुडी मारली. कॅटरिनाला बाहेर काढले.

“ही सुद्धा माझी बायको नाही.”

देवाने तिसर्‍यांदा बुडी मारली. यावेळेस खर्‍या बायकोला बाहेर काढले.

विचारवंत म्हणाला, “देवा तुझे खूप उपकार झाले.”

देव अंतर्धान पावला. त्याबरोबर त्या दोघीही.

बायको सदगदित झाली होती.

विचारवंत मात्र मनांतून नाराज झाला होता.

“देवा, प्रामाणिकपणाचे हेच का फळ ?”

Published by

Tirshingrao

I am a Cancerian and pessimistic in nature.

यावर आपले मत नोंदवा